वाई, पुढारी वृत्तसेवा : मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील पती आणि सासूचा विश्वास संपादन करून बावीस वर्षांच्या महिलेवर वाईत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने वाई शहरासह तालुक्यात खळबळ उडली आहे.
याप्रकरणी विठ्ठल गणपत पवार (पत्ता माहिती नाही) याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ( मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बलात्कार ) मुंबई येथील एका बावीस वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासूची विठ्ठल गणपत पवार या व्यक्तीची ओळख होती. त्या व्यक्तीने तिच्या सासर्याच्या गावी मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध मिळते. अशी बतावणी करुन त्या महिलेला वाईमध्ये आणले. वाई शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आणून एका खोलीत कोंडून ठेवले. तसेच मारहाण करत महिलेवर बलात्कार केला.
यानंतर विठ्ठल पवार याने चुलत्याच्या गावी यवतमाळ येथे या महिलेला नेले. तेथेही मारहाण करुन महिलेवर बलात्कार केला. याची माहिती काेणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील पीडितेला दिली.
या प्रकरणी विठ्ठल पवार याच्याविरुद्ध संबंधित महिलेने कुर्ला मुंबई येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार वाई पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर संशयित आराेपीवर गुन्हा दाखल झाला असून तपास वाई पोलिस करत आहेत.
हेही वाचलंत का?