Latest

Summer Food : उन्हाळ्यात अंडी, चिकन आणि मासे खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'उन्हाळा आला…तब्येत सांभाळा' अस म्हणतं बहुतांशजण आपल्या आहाराकडे लक्ष देतात. आपण उन्हाळ्यात आपलं शरीर थंड कसे राहील, याकडे लक्ष देत असतो. शरीराला थंड ठेवणाऱ्या पदार्थांना आहारात प्राधान्य देतो. असे पदार्थ शरीराला थंड करतात आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी पुरेसे हायड्रेशन देतात; पण या दिवसात आपल्याला प्रथिनांची गरजही असते. प्रथिने शरीरासाठी अत्यावश्यक आहेत कारण ते स्नायूंची ताकद वाढवण्यास मदत करते आणि वाढीस कारणीभूत ठरते. प्रथिने असणारे अंडी, चिकन आणि मासे यासारखे पदार्थ गरम महिन्यांत वगळतो कारण ते शरीरासाठी "उष्ण" मानले जातात; पण आहारतज्ज्ञ याबाबत काय सांगतात ते जाणून घेवूया…(Summer Food)

Summer Food : अंडी, कोंबडी आणि मासे खा, पण….

उन्हाळ्यात शरीरासाठी खूप गरम असल्यामुळे जास्त प्रथिनेयुक्त पदार्थांकडे जसे की अंडी, कोंबडी आणि मासे याकडे दुर्लक्ष करतो. पण आहारतज्ज्ञ याबद्दल उलट सांगतात. आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी याबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, 'उन्हाळ्यात  अंडी, चिकन आणि मासे हे अन्नपदार्थ कमी प्रमाणात असले तरी ते खाणे आवश्‍यक आहे.'

नमामी अग्रवाल व्हिडिओमध्ये पुढे असं म्हणतात की, हे पदार्थ आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. हे पदार्थ तुमची उर्जा पातळी उच्च ठेवण्यासाठी विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देत असतात. अंडी विशेषत: शरीरात उष्णता निर्माण करतात; परंतु जर ते कमी प्रमाणात खाल्ले तर ते उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ ठरू शकतात. याशिवाय, अंडी, चिकन आणि मासे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हृदयाचे आरोग्य सुधारतात, रक्तदाब नियंत्रित करतात आणि निरोगी हाडे आणि दात वाढवतात. हे सर्व पदार्थ पौष्टिक आहेत.

Summer Food

जर तुम्ही शाकाहारी असाल तर…

तुम्ही शाकाहारी असाल, तर शेंगा, चणे, काळे बीन्स, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, बदाम,  बीन्स  यासारखे पदार्थ खाऊ शकता. यात प्रथिनांचे उत्तम स्रोत असतात.

उन्‍हाळ्याच्‍या दिवसात आहारतज्ज्ञ भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीराला नारळाचे पाणी, पुदिन्याचे पाणी, लिंबू पाणी, ताज्या फळांचे रस आणि ताक यांचे सेवन केल्यास हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. कोंबडी, अंडी आणि मासे यांचे सेवन माफक प्रमाणात केले जावे, त्यामुळे पोषक आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर फळे आणि भाजीपाला जास्त प्रमाणात खाणे आवश्यक आहे.

Summer Food

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT