Latest

कामाशी एकनिष्ठ व समर्पण वृत्ती ठेवल्यास यश मिळते : लतादिदींचा हुपरीकरांना कानमंत्र

अमृता चौगुले

हुपरी, पुढारी वृत्‍तसेवा : आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून समर्पण वृत्तीने काम केले तर नक्कीच यशस्वी होणार, असा कानमंत्र भारतरत्न गानसाम्राज्ञी लताताई मंगेशकर यांनी हुपरी येथे दिला होता. आज त्यांच्या आठवणींनी हुपरीकर गहिवरून गेले आहेत. हुपरी आणि लतादिदी यांचे संबंध एका कुटुंबासारखे होते. येथील दैने आणि भोजे कुटुंबाशी त्यांचा जिव्हाळयाचा संबध होता. रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला त्या हुपरीत आल्या होत्या. त्यावेळी पन्हाळ्याहून त्यांना आपल्या मोटारीतून येथील चांदी उद्योजक राजेंद्र शेटे,  सुभाषराव  भोजे  यानी आणले होते.

राजेंद्र शेटे यानी लतादीदी यांना एक प्रश्न विचारला होता की, "यशस्वी होण्याचे रहस्य काय?  त्यावेळी लतादीदींनी  यशाचा कानमंत्र दिला की, आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून समर्पण वृत्तीने काम केले तर नक्कीच यश मिळत. त्यावेळी नुकताच 'दिल तो पागल है', चित्रपट रिलीज झाला होता. लता दीदींनी विचारले की, प्रेक्षकांना गाणी आवडत आहेत का? प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे? एवढ्या मोठ्या दिग्गज व्यक्तिमत्वाने इतक्या सखोलपणे चौकशी करणे म्हणजे महत्वपूर्ण असेच आहे. लतादिदी राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यावेळी त्यांनी हुपरी येथील व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीला संगणक प्रयोगशाळा उभारण्यासाठी खासदार फंडातून १० लाखांची मदत दिली होती, सुभाषराव भोजे यांच्यामुळे हे शक्य झाले होते, असे सुनिल कल्याणी यानी सांगितले.

चांदी उद्योजक सुभाष भोजे यांच्या माध्यमातून उषा मंगेशकर रजनी हा संगीत कार्यक्रम त्यांनी रोटरी क्लबच्या मदतीसाठी मिळवून दिला होता. या संगीत रजनी कार्यक्रमावेळी त्या स्वतः आल्या होत्या. त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून या कार्यक्रमाची फोटोग्राफी केली होती.
राजकुमार दैने कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. सामाजिक कार्यकर्ते उमेश दैने यांचे वडील शशिकांत दैने हे त्यांच्याशी त्या काळी फोनवर बोलत त्यांचा पत्रव्यवहारही व्हायचा. त्या येथील चांदी उद्योजक सुभाष भोजे, सतिश भोजे यांच्याघरी आवर्जून येत होत्या. त्यांच्या निधनामुळे हुपरीकर शोकसागरात बुडाले आहेत.
 

हे ही वाचलं का  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT