खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी ; शेतकरी संघटनेचे कृषीमंत्र्याना साकडे | पुढारी

खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी ; शेतकरी संघटनेचे कृषीमंत्र्याना साकडे

देवळा ; प्रतिनिधी : रासायनिक खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध करून द्यावा व खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

सद्या कसमादे परिसरात कांदा व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र बाजारपेठेत रासायनिक खतांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग बेजार झाला आहे. काही कृषी दुकानांत असतांना देखील शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याच्या तक्रारी वाढतांना दिसत आहेत. मोठ्या शेतकऱ्यांना खते उपलब्ध होतात पण लहान शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याची खंत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच रासायनिक खतांची साठेबाजी असून, अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करून मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होणे कामी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेवटी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, अरुण शिरसाठ, संजय चव्हाण, योगेश गुंजाळ आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button