Latest

Stock Market Closing Bell | बाजारात खरेदी! सेन्सेक्स २७५ अंकांनी वाढला, मेटल, रियल्टी तेजीत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जगभरातील बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज मंगळवारी (दि.२१) भारतीय शेअर बाजारही वधारला. आजच्या सत्रात सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला. त्यानंतर सेन्सेक्स २७५ अंकांनी वाढून ६५,९३० वर बंद झाला. तर निफ्टी ८९ अंकांच्या वाढीसह १९,७८३ वर स्थिरावला. आज सुमारे १,९५७ शेअर्स वाढले. १,६३४ शेअर्समध्ये घट झाली. तर, १२४ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. विशेष म्हणजे दोन दिवसांनंतर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला.

दरम्यान, ८३.३४ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत भारतीय रुपया प्रति डॉलर ८३.३५ च्या सपाट पातळीवर बंद झाला.

संबंधित बातम्या 

नेमकं काय घडलं?

आजच्या ट्रेडिंग सत्रात क्षेत्रीय पातळीवर रियल्टी, मेटल आणि फार्मामध्ये तेजी राहिली. हे प्रत्येकी १ टक्क्याने वाढले. तर एफएमसीजी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दबावाचा सामना करावा लागला. एचडीएफसी बँक, रिलायन्स आणि इन्फोसिस सारख्या हेवीवेट शेअर्सच्या जोरावर बाजारात आज तेजी राहिली. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ वाढले.

कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्स आज ६५,८६० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६६ हजारांपर्यंत वाढला. सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टायटन, रिलायन्स, टाटा मोटर्स, सन फार्मा, भारती एअरटेल हे शेअर्स सर्वांधिक वाढले. तर एलटी, एसबीआय, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० वर एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, अदानी एंटरप्रायजेस, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील हे २ ते २.८१ टक्क्यांदरम्यान वाढून टॉप गेनर्स राहिले. तर बीपीसीएल, LTIMindtree, एलटी हे घसरले.

'या' रेल वॅगन उत्पादक कंपनीच्या शेअर्सची कमाल

स्मॉलकॅपमधील रेल वॅगन उत्पादक Titagarh Rail Systems चे शेअर्स आजच्या सत्रात ११ टक्क्यांनी वाढून १,०४५ रुपयांच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचले. त्यानंतर हा शेअर्स ७ टक्के घसरणीसह १,००१ रुपयांवर स्थिरावला. (Titagarh Rail Systems Share Price)

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारी ६४६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ७७.७७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

जागतिक बाजार

अमेरिकेच्या शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आशियाई बाजारांनीही मंगळवारी दोन महिन्यांच्या उच्चांकावर व्यवहार केला. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्याने डॉलर अडीच महिन्यांतील निचांकी पातळीवर गेला. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.९७ टक्क्यांनी वाढून ५१०.११ वर गेला. या निर्देशांकाची ही १८ सप्टेंबरपासूनची उच्चांकी पातळी आहे. जपानचा निक्केई आज किरकोळ प्रमाणात खाली आला. कारण डॉलरच्या तुलनेत येनच्या वाढीमुळे ऑटोमेकर्सच्या शेअर्सची विक्री झाली. निक्केई ०.१ टक्के घसरून ३३,३५४ वर आला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT