Tata Technologies IPO | प्रतीक्षा संपली! टाटा टेक्नोलॉजीजचा आयपीओ ‘या’ तारखेला होणार खुला | पुढारी

Tata Technologies IPO | प्रतीक्षा संपली! टाटा टेक्नोलॉजीजचा आयपीओ 'या' तारखेला होणार खुला

पुढारी ऑनलाईन : गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. कारण जवळपास २० वर्षानंतर टाटा समुहातील (Tata Group) कंपनीचा इनिशिअल पब्लिक ऑफर म्हणजे आयपीओ (IPO) बाजारात येत आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies) आयपीओ २२ नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. तर तो २४ नोव्हेंबरला बंद होईल. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्स लिमिटेडची (Tata Motors Limited) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. जवळपास दोन दशकानंतर येणारा हा टाटा कंपनीचा हा पहिला आयपी आहे. त्यांचा याआधीचा आयपीओ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा होता. तो २००४ आला होता. (Tata Technologies IPO)

संबंधित बातम्या 

टाटा टेकचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) इश्यू असेल. या आयपोओ अंतर्गत ९.५७ कोटी इक्विटी शेअर्सची विक्री होईल. जी कंपनीच्या एकूण पेड-अप शेअर कॅपिटलच्या २३.६ टक्के आहे. या इश्यूची किंमत बँड लवकरच जाहीर केली जाणार आहे. OFS अंतर्गत मूळ टाटा मोटर्स ४.६२ कोटी शेअर्स विकेल. तर अल्फा टीसी होल्डिंग्स ९७.१ लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ४८ लाख शेअर्स विकेल.

२० वर्षांनंतर इश्यू होणारा टाटा समूहाचा पहिला आयपीओ

हा IPO बहुप्रतिक्षित आहे. कारण जवळपास २० वर्षांनंतर इश्यू होणारा टाटा समूहाचा पहिला आयपीओ आहे. टाटा समूहाचा शेवटचा IPO जुलै २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा होता. टाटा मोटर्सची टाटा टेकमध्ये ७४.६९ टक्के, अल्फा टीसी होल्डिंग्सची ७.२६ टक्के आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ ची ३.६३ टक्के भागीदारी आहे.

बाजार नियामक सेबीने (Markets regulator Sebi) जूनमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Technologies) इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO) ला मान्यता दिली होती. टाटा टेक्नॉलॉजीज ही जागतिक मूळ उपकरण उत्पादकांना (OEMs) उत्पादन विकास आणि डिजिटल सोल्यूशन्स ऑफर करणारी आघाडीची जागतिक अभियांत्रिकी सेवा कंपनी आहे.

टाटा मोटर्सने सप्टेंबर तिमाहीत ३,७८३ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमवला आहे. विशेषतः टाटा मोटर्सची उपकंपनी जग्वार लँड रोव्हरची दमदार कामगिरी राहिली आहे. कंपनीच्या सकारात्मक वाटचाल सलग चौथ्या तिमाहीत कायम राहिले आहे.

बाजारात सूचीबद्ध नसलेला टाटा टेक हा NSE आणि रिलायन्स रिटेल नंतरचा सर्वात जास्त चर्चेत असलेला स्टॉक आहे. (Tata Technologies IPO)

हे ही वाचा :

Back to top button