Latest

पत्नी दुसऱ्या नवऱ्यापासून गरोदर, जावयाने सासूच्या गुप्तांगात बांबू आणि चाकूने वार करून केला खून

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विलेपार्लेतील वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणाची भयंकर बाजू पोलीस तपासात समोर आली. या 61 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच जावयाने 2 सप्टेंबरला रात्री हत्या केली.

बांबूचा वापर करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाल्याने या भयंकर जावयाविरुद्ध आणखी 377 कलम देखील लावण्यात आले आहे.

या आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली. सासूची हत्या केल्यानंतर आरोपी जवळच असलेल्या एका बारमध्ये गेला होता.

बारच्या मालकासह मॅनेजरला त्याने जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम दिली नाही तर, परिणाम वाईट होतील असे त्याने धमकावले. त्यांच्याकडून तीन हजार रुपये आणि दारुच्या बाटल्या घेऊन तो पळून गेला होता.

आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 28 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सोनसाखळीच्या गुन्ह्यात त्याची 31 ऑगस्ट 2021 रोजी जेलमधून सुटका झाली होती.

जेलमधून बाहेर येताच त्याने सासूची हत्या केली. त्याच्या पत्नीने दुसर्‍या तरुणासोबत परस्पर विवाह केला होता.

हे सासूला माहित असताना तिने तिचा पत्ता या जावयाला दिला नव्हता. त्यातून झालेल्या वादातून त्याने सासूची हत्या केली.

शवविच्छेदन अहवालात तिच्या गुप्त भागावर दुखापत झाल्याचे दिसून आले.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT