Latest

आदेश बांदेकर-शरद पोंक्षे यांच्यात सोशल मीडिया वॉर, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेते शरद पोंक्षे यांच्यात सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने वादळ उठले आहे. आदेश बांदेकरांनी ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोंक्षे यांच्या एक जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत बांदेकरांनी 'हा शरद पोंक्षे तुच ना ?' अशीही कॅप्शन लिहिलीय.

नेमकं काय आहे प्रकरण?

शरद पोंक्षेंनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यांनी त्यांच्या पुस्तकातील पानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्या पानावर शरद यांनी त्यांना कॅन्सरच्या निदानाविषयी सांगितलं आहे. कशा प्रकारे त्यांना कॅन्सरचं निदान झालं आणि त्यांनी संकटसमयी आदेश बांदेकरांना फोन करून याविषयी सांगितले. बांदेकर हे त्यांच्यासाठी मदतीला कशा प्रकारे धावून आले. याविषयी त्यांनी या पानात सविस्तर लिहिलंय.

यावेळी आदेश बांदेकरांचं कौतुकही त्यांनी केलं आहे. शरद म्हणाले, "असा हा आदेश, सहृदयी माणूस!" ही पोस्ट शेअर केलीय. याचसोबत पोंक्षे यांनी कॅप्शनमध्ये ल्हिलंय- "शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही". तसेच त्यांनी आदेश बांदेकर यांना टॅगही केले आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कमेंट्सचा पाऊस पडतोय.

इन्स्टाग्रामवर शरद पोंक्षे यांच्या मुलाखतीचा जुना व्हिडिओ आहे. त्यात म्हटलंय- 'सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. मी आदेशला फोन केला आणि सांगितले की, अशी शक्यता आहे असे डॉक्टर सांगत आहेत. काय करू मला कळत नाहीये. आदेश मला म्हणाला -कसलीही काळजी करू नकोस. मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. मला त्यांच्याकडे पाठवले आणि पुढे सर्व प्रोसेस सुरु झाली. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना समजलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.'

शरद पोंक्षेंचा खुलासा…

बांदेकरांनी पोस्ट शेअर केल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पोंक्षे यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले- बांदेकरांशी कोणताही वाद नाही. पोस्ट पाहिल्यावर वाईट वाटलं. बांदेकरांशी मैत्री कायम आहे आणि राहणार. कॅन्सरच्या लढ्यात शिंदेंची साथ मिळाली. बांदेकरांचा गैरसमज झालाय.

SCROLL FOR NEXT