किरकोळ वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला: केडगाव येथील घटना | पुढारी

किरकोळ वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला: केडगाव येथील घटना

केडगाव : पुढारी वृत्तसेवा: केडगाव येथे किरकोळ कारणावरून दोघांवर कोयत्याने वार करून जखमी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दादा खंडू गरदडे (वय ६०) आणि शिवाजी माणिक वाघमोडे (दोघेही रा. केडगाव) यांच्यावर हल्ला झाला आहे . रहीम हुसेन शेख (वय ५०, रा. केडगाव) याने हा प्रकार केला असून तो स्वतःच पोलिसात हजर झाला आहे. ही घटना २७ जून ला सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव स्टेशन परिसरात रेल्वे फलाट क्रमांक दोनच्या उत्तरेला ओढ्यात पिंपळाच्या झाडाखाली गरदडे, वाघमोडे आणि अन्य काही बसले होते.

या ठिकानी रहीम आला होता. मला इथं बसायचे आहे, जागा द्या म्हणून जखमी दोघांशी त्याची बाचाबाची झाली. यानंतर रहीम तेथून निघून गेला आणि काही वेळातच परत आला. त्यावेळी त्याच्या हातात कोयता होता. त्यांनी सरळ गरदडे आणि वाघमोडे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गरदडे याच्या मानेवर आणि गालावर जबर वार बसल्याने तो जखमी झाला आहे. वाघमोडे याला सुद्धा पाठीवर वार केल्याची माहिती मिळाली आहे . गरदडे हे केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून वाघमोडे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले आहेत. घटना करणारा रहीम यवत पोलिसात जाऊन हजर झाला आहे.

हेही वाचा

उजनीचे पाणी पोहोचले औज बंधार्‍यात

सोलापूर : खतांचा साठा केल्यास गुन्हे दाखल करू

Back to top button