Latest

सांगली : जिल्हा परिषद आरक्षण! खानापूर तालुक्यात महिलाराज; अनेकांचा हिरमोड

सोनाली जाधव

विटा : पुढारी वृत्तसेवा; खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व चारही गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आजच्या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीत उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षात तयारी केलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.

खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांचा हुकमी असलेला नागेवाडी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलासाठी आरक्षीत झाला आहे. या गटामध्ये पंचायत समितीचे माहुली व गार्डी हे दोन्ही गण सर्वसाधारण झाले आहेत. त्यामुळे सुहास बाबर यांना पुन्हा गार्डी गणातून निवडणूक लढवावी लागेल. पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण झाले तर सुहास बाबर हे गार्डी गणाचे उमेदवार असतील असे सांगण्यात येत आहे. यंदा भाळवणी जिल्हा परिषद गटातून शिवप्रताप समुहाचे विठ्ठलराव साळुंखे यांनी जोरदार तयारी केली होती. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी देखिल भाळवणी गटास पसंती दिली होती. परंतू या ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. या गटातील भाळवणी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला तर आळसंद पंचायत समिती गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. भाळवणीचे विद्यमान सदस्य संजय मोहिते यांचा गण आरक्षीत झाला आहे.

महिलाराज : राजकीय उलथापालथ?

नव्याने निर्माण झालेल्या जिल्हा परिषद करंजे गटात माजी जिल्हा परिषद सदस्य सुहासनाना शिंदे यांचे नाव घेतले जात होते. परंतू हा गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. अर्थात या जागेवर विद्यमान पंचायत समिती उपसभापती सारिका माने यांच दावेदारी असु शकते. तर या गटातील पंचायत समितीच्या बलवडी गण हा सर्वसाधार ण झाल्याने सुहास शिंदे हे गट लढवू शकतात. तर करंजे हा गण सर्वसाधारण महिला आरक्षीत झाला आहे. बहुचर्चित लेंगरे हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिलासाठी आरक्षीत झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांचे सुपुत्र संदिप मुळीक यांनी जोराची तयारी केली होती. परंतू आता त्यांना या ठिकाणी महिला उमेदवारी दयावी लागणार आहे. या गटांतर्गत येणार्‍या लेेेंगरे पंचायत समिती या गणावर अनुसुचित महिला चे आरक्षण पडले आहे. त्यामुळे माजी सभापती मनिषा बागल यांचा पत्ता कट झाला असला तरी त्या जिल्हा परिषदेसाठी प्रबख दावेदार ठरू शकतात. तर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या निलम सकटे या पंचायत समित गणाच्या उमेदवार असू शकतात. याच गटातील पारे हा गण ओबीसी पुरूष प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहे. विद्यमान सभापती महावीर शिंदे यांचा यामुळे पत्ता कट झाला आहे. एकूणच तालुक्यात सर्वच गणात आणि गटात मोठे फेरबदल झाल्याने राजकीय उलथापालथ होणार आहे.

दिग्गजांचा पत्ता कट तर नव्या ठिकाणी संधी

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवप्रतापचे विठ्ठलराव साळुंखे, श्रेयस उद्योग समुहाचे संदिप मुळीक, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, विद्यमान सदस्या निलम सकटे, सुलभा अदाटे, सभापती महावीर शिंदे, माजी सभापती मनिषा बागल, सदस्य संजय मोहिते, सारिका माने यांचा पत्ता कट झाला आहे. काहींन नव्या ठिकाणी संधी मिळू शकते, यामध्ये सुहास बाबर यांना गार्डी गणातून, सुहास शिंदे यांना बलवडी गणातून, निलम सकटे यांना लेंगरे गणातून तर जिल्हा परिषदेसाठी मनिषा बागल यांना लेंगरे गटातून तसेच सारिका माने यांना करंजे गटातून नव्याने संधी मिळू शकते.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT