सातारा : कराडात एकमेव मसूर जिल्हा परिषद गट खुला ; तालुक्यातील दिग्गजांना धक्का | पुढारी

सातारा : कराडात एकमेव मसूर जिल्हा परिषद गट खुला ; तालुक्यातील दिग्गजांना धक्का

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड तालुका पंचायत समितीसह सातारा जिल्हा परिषदेच्या कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले. या आरक्षणात कराड तालुक्यातील मसूर हा एकमेव जिल्हा परिषद गट खुला राहिला असून अन्य सर्व 13 जिल्हा परिषद गटांवर आरक्षण पडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे वगळता तालुक्यातील अन्य दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेनंतर कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे पूर्वीच्या 12 जिल्हा परिषद गटांऐवजी कराड तालुक्याला 14 जिल्हा परिषद गट असून पंचायत समितीचे 24 गणांऐवजी आता 28 जिल्हा परिषद गण झाले आहेत.

कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण :

  • पाल – सर्वसाधारण महिला
  • उंब्रज – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • मसूर- सर्वसाधारण
  • कोपर्डे हवेली – अनुसूचित जाती महिला
  • चरेगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • तांबवे – अनुसूचित जाती
  • विंग – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • वारुंजी – सर्वसाधारण महिला
  • सैदापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • कार्वे – सर्वसाधारण महिला
  • वडगाव हवेली – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • रेठरे बुद्रुक – नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • काले – सर्व साधारण महिला
  • येळगाव – अनुसूचित जाती महिला         

पंचायत समिती कराड गण निहाय आरक्षण :

अनुसूचित जाती प्रवर्ग : 

1) काले – महिला राखीव
2) कोर्टी – महिला राखीव
3) सुपने – पुरुष

नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC :

4) आटके – महिला राखीव
5) चरेगाव- महिला राखीव
6) वडगाव हवेली – महिला राखीव
7) कोळे – पुरुष
8) इंदोली – पुरुष
9) सैदापूर- पुरुष

सर्वसाधारण महिला : तळबीड, वारुंजी, वाघेरी, येळगाव, पाल, उंब्रज, कोपर्डे, हवेली, मसूर, किवळ

खुला वर्ग : हजारमाची, कोयना वसाहत, कार्वे, उंडाळे, शेरे, ओंड, रेठरे बुद्रुक, गोळेश्वर, तांबवे, विंग

हेही वाचा :

Back to top button