Latest

Sai Pallavi : काश्मिरी पंडित आणि लिचिंगच्या वक्तव्यावर अभिनेत्री साई पल्लवी म्हणाली…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मिरी पंडित आणि लिचिंगवरून तथाकथित केलेल्या वक्तव्यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ( Sai Pallavi ) अडचणीत आली आहे. यानंतर तिच्याविरोधात हैदराबादमध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली. यानंतर दोन दिवसानंतर साई पल्लवीने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिले आहे.

अभिनेत्री साई पल्लवीने ( Sai Pallavi ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एका पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मी पहिल्यादा दोनवेळा विचार करून आपलं म्हणणं मांडत असल्याचे सांगत माझ्या वक्तव्याचा पुन्हा विपर्यास करू नका, असे म्हटले आहे.  तिने लिहिलेल्या पोस्ट बद्दलदेखील माफी मागितली आहे.

"मी तुमच्‍याबराेबर पहिल्यांदाच संवाद साधत आहे. मला माहित आहे की, माझे मत मांडण्यास उशीर झाला आहे. त्याबद्दल मला माफ करा. मी बोललेलं सगळं चुकीच्या पद्धतीने समोर आलं आहे. मला स्वत:लाच याबाबत शॉक बसला आहे. मी बोलले त्‍याचा चुकीच्या अर्थ घेतला जात आहे. मला लहानपणापासून चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करण्यास शिकवले आहे. कोणी लहान किंवा मोठे नसतं हे शिकवले आहे. या वातावरणात मी मोठी झाली आहे. डावे आणि उजवे विचार सरणीबाबत मला काहीही कळंत नाही. यात कोण बरोबर तर कोण चुकीचे हे मला सांगता येणार नाही. परंतु, द काश्मीर फाईल्समध्ये झालेला अन्याय आणि नरसंहार चित्रपटात दाखवण्यात आल्याने माझ्या मनावर खोल परिणाम झाला.

यावेळी गाईची तस्करी करणार्‍या मुस्लीम चालकाला मारण्यात आलं आणि त्यावेळी जय श्री रामच्या घोषणा दिल्या हे मला अजिबात आवडले नव्हतं. यामुळेच मी बोलले. मग तेव्हा जे घडलं आणि आता जे घडतंय त्यात फरक काय? कोणत्याही धर्माच्या नावे होणारी हिंसा चुकीची असतं इतकेच मला म्हणायचं होते. पण यानंतर काहीजण मॉब लिंचिंग समर्थन करत निदर्शने करण्यात आले'. असे साई पल्लवीने म्हटले आहे.

साई काय म्हणाली होती?

साई पल्लवीने एका युट्यूब चॅनेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, तिला तिच्या विचारसरणी बद्दल विचारले असता ती म्हणाली, " मला मी लहान असल्यापासून शिकवण्यात आले आहे की, चांगली व्यक्ती हो, त्यामुळे मी तटस्थ राहण्याला पसंती देते.  जर का तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे असाल आणि जर का तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता."

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT