Latest

Sai Kalyankar : ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री लवकरचं अडकणार विवाहबंधनात

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री सई कल्याणकर (Sai Kalyankar) हिचा साखरपुडा पार पडला आहे. अभिनेता अंकुश चौधरीसोबत ती झक्कास या चित्रपटात दिसली होती. सई कल्याणकर ही उत्तम नृत्यांगना आहे. ती उत्कृष्ट भरतनाट्यम करते. स्टार प्रवाहवरील तुझे नि माझे घर श्रीमंताचं या मालिकेतही ती झळकली होती. (Sai Kalyankar) तिने साखरपुड्याचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत चोपडाईची भूमिका तिने साकारली होती. त्याचबरोबर सईने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केलंय.

सई प्रशांत शिवराम चव्हाणसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर साखरपुडा झाल्याचे सांगून फोटो शेअर केले आहेत. तिला अभिनंदन आणि शुभेच्छा चाहत्यांकडून दिल्या जात आहेत.

सईचा होणारा पती प्रशांत चव्हाण डॉक्टर आहे. त्याने नॅनो केमिस्ट्रीतून पीएच.डी केलीय. सईचं हे अरेंज मॅरेज आहे. तिने साखरपुड्याच्या सोहळ्यात मोजक्या लोकांना बोलावलं होतं. सईच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

भेटी लागी जिवा या लोकप्रिय मालिकेत सईने महत्वाची भूमिका साकारली होती. सई कल्याणकर झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेत दिसली होती. कलर्स मराठीवर गणपती बाप्पा मोरया या मालिकेतही तिने सिद्धीची व्यक्तिरेखा साकारली होती.

सई दिसायलाही खूप सुंदर आहे. तिने एकापेक्षा एक मालिका केल्या. खूप सुंदर अभिनयातून तिने मराठी कला विश्वात आपले पाय रोवले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT