Latest

Ajit Pawar-Rohit Pawar : पवार काका पुतण्याचं ‘Mission’ पिंपरी-चिंचवड

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार हे शनिवारी २३ तारखेला पिंपरी-चिंचवडच्या दौर्‍यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरात रोहित पवार यांचा आठवडाभरातील हा दुसरा दौरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रोहित पवार यांच्यावर शहराची जबाबदारी सोपविली आहे. गणेशोत्सवानिमित्त रोहित पवार शहरात शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

संबंधित बातम्या :

पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची निवड केल्यानंतर शहरात सोमवारी (दि.18) दुचाकी रॅली आयोजित केली होती. त्याचे नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर, शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाची आरती शनिवारी रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतील दौर्‍यात ते शहरातील चिंचवड, भोसरी व पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन आरती करतील. तसेच, हाऊसिंग सोसायट्यांनाही भेट देणार आहेत. माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेेणार आहेत, असे तुषार कामठे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवारही करणार शक्तिप्रदर्शन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी एक दिवस आरतीचा हा उपक्रम राबवून दिवसभरात तब्बल ४५ मंडळांच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली होती. त्यानंतर यंदा अजित पवार हे रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून शहरात असणार आहेत. चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरापासून सुरुवात करणार आहेत. तब्बल पन्नास मंडळांना भेट देणार असल्याचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT