Latest

अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

backup backup

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्रज्वल एकनाथ जोगदंडे (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पीडित १४ वर्षीय मुलगी व प्रज्वल यांची फेब्रुवारी महिन्यात ओळख झाली. ओळखीनंतर मैत्री व मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर प्रज्वलने पीडित मुलीला भेटायला बोलाविले. तो तिला दुचाकीवर बसवून एका निर्जनस्थळी घेऊन गेला.

अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडित मुलीला तेथे थांबायला लावून तो आपल्या एका मित्राला आणायला गेला. काही वेळानंतर तो मित्राला घेऊन परतला. मित्राला बाहेर उभे करून प्रज्वलने पीडित मुलीसोबत असभ्य वर्तन केले. त्यामुळे पीडितेने त्यास मनाई करून आरडाओरड केली. त्यावर प्रज्वलने तिला मारहाण करून लैंगिक शोषण केले.

सदर प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी त्याने तिला धमकी दिली. त्यानंतर प्रज्वलने पीडित मुलीला एका ठिकाणी सोडून दिले. सदर घटनेनंतर पीडित मुलीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

कुमारिकेवर लादले मातृत्व

मध्य प्रदेशातील रहिवासी एका २० वर्षीय तरुणीवर संशयित (मोनू गोसाई धोत्रे वय, २० रा. नरखेड, नागपूर) याने अत्याचार केला.

पीडिता गर्भवती असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर तिने मुलाला जन्म दिला.

त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी पीडितेने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी संशयित आरोपी मोनूविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

घटनास्थळ मध्य प्रदेश हद्दीत येत असल्यामुळे प्रकरण तेथील पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT