पुणे; पुढारी वृत्तसेवा : कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याचा निर्णय मागील महाविकास आघाडी सरकारचाच आहे. या प्रस्तावावर त्या वेळच्या सरकारच्या प्रमुखाची सही आहे. हे सरकार केवळ त्याची अंमलबजावणी करीत आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी सोमवारी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले तसेच एका कार्यक्रमासही हजेरी लावली. या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन कर्मचारी भरती करण्यास बराच कालावधी लागतो. काही पदे रिक्त ठेवता येत नाहीत. त्यामुळे नवीन पदभरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्याचा निर्णय त्या वेळी घेण्यात आला. यासंदर्भातील प्रस्तावावर त्या वेळच्या प्रमुखांची सही आहे. त्या निर्णयानुसार आम्ही आता शासन आदेश काढला आहे. मात्र, या आदेशावरून तरुण-तरुणींची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. शासन आदेश जाळण्याची नौटंकी करण्यात आली, असेही ते म्हणाले.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती येथे नियोजित कार्यक्रम होते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौर्यास अनुपस्थित राहिलो. ज्या वेळी मला शहा यांचा दौरा आला, त्या वेळीच मी त्यांच्या कार्यालयाला नियोजित कार्यक्रमाबद्दल कळविले होते. त्यांच्या सूचनेनुसारच मी माझ्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली, असेही पवार म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, लोकसभेचा विचार केला नाही. एवढ्या लवकर त्याबाबत चर्चा करून नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. मी कामाचा व विकासाचा विचार करतो. असे झाले तर काय होईल आणि तसे झाले तर काय होईल, याचा विचार करीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समोर ठेवून मी काम करतो, असेही पवार म्हणाले.
शिवसेनेमधील सत्तासंघर्षावर बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. जो निर्णय होऊल तो सर्वांना मान्यच करावा लागेल. जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत जर-तरला काही अर्थ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन 14 महिने होत आले. त्यांच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही, असे पवार म्हणाले. तसेच, राष्ट्रवादीच्या उर्वरित सात आमदारांनाही आमच्याकडे यायचे आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी आपणास सांगितल्याचा गौप्यस्फोटही पवार यांनी या वेळी
राज्यातील अनेक भागांत अद्यापही पाऊस झाला नाही, त्यामुळे जोरदार पाऊस पडू दे. पाऊस झाल्यावर बळीराजा सुखी होतो. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहू दे, हीच प्रार्थना गणपती बाप्पाकडे केल्याचे अजित पवार
यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असल्यापासूनचा आहे. या प्रश्नावर वारंवार बैठका झाल्या, मात्र, प्रश्न सुटू शकलेला नाही. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांना आरक्षण मिळवून देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे.
हेही वाचा