पुढारी डिजिटल : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांना कंत्राटी भरतीच्या प्रश्नावर छेडलं असता ते म्हणतात, "मधल्या काळात कॉन्ट्रॅक्ट बेसिस बर भारतीचा जी आर निघाला. या गोष्टीला प्रचंड विरोध झाला. ही पूर्ण नौटंकी आहे. हा महविकास आघाडीच्या काळातील निर्णय आहे. त्या त्या वेळी पदावर असलेल्या संबंधितांची त्यावर सहीदेखील आहे. दरम्यान मी अर्थमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा काम करताना असं लक्षात आलं कि बऱ्याच जागा भरल्या पाहिजेत. त्यामुळे विविध विभागातील दीड लाख जागा भरल्या जाणार आहेत. टप्याटप्याने या जागा भरल्या जातील. तरुण तरुणींना असं सांगणं आहे की या संदर्भाने कोणी डोकी भडकवत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये.
पालकमंत्री पदाचा निर्णय माझ्याकडे नाही
शपथविधीवेळी अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या आमदारांना पालकमंत्रीपद मिळेल असं सांगितलं गेलं होतं याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, 'या दरम्यान पालकमंत्री पदाची कमिटमेंट केली नाही. याबाबतचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. मंत्रिमंडळात कोणाला कोणतं पद द्यायचं याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. हा विषय माझ्याकडे असता तर मी एक घाव दोन तुकडे करत निर्णय घेतला असता.