Latest

शिवसेना- वंचितची युती लवकरच, बोलणी पूर्ण : प्रकाश आंबेडकर

अनुराधा कोरवी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरेसोबतची युती ही प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित युती राहणार आहे. ती बोलणी पूर्ण झाली असून लवकरच पिक्चर समोर येईल असे मत वांचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

सध्या मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती जवळपास पूर्ण झालेली आहे. मुंबई मनपाच्या निवडणुका आम्हीसोबत लढणार आहोत. जागा वाटप निश्चित झाले आहे. ही युती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ही राहणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमच्यासोबत आले तरी आमची हरकत नाही, परंतु, या दोन्ही पक्षांना सोबत घ्यायचे की नाही हे ठाकरे ठरवतील. असेही ते यावेळी म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण खोडारडे आणि माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीची युती तोडून वंचितशी जुळवण्याची बोलणी झाली आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडने नकार दिला. त्यानंतर त्यांनी पदाची लालसा दाखवत तुम्ही फक्त दलितांसाठी जागा मागा. ओबीसी गरीब मराठा यांच्यासाठी जागा न मागण्याची अट घातली त्यामुळे मी दूर झालो. असेही ते म्हणाले.

भावी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

भाजप आणि काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरवले असून भाजपचा आगामी मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांना समोर आणण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात असे दोन चेहरे समोर येणार आहेत.

आम्हाला होणार फायदा

शिक्षक व पदवीधर मतदारसंघात विविध पक्षातील अंतर्गत बंडळीचा वांचितला फायदा होणार असल्याने या दोन्ही ठिकाणी आम्ही बाजी मारण्याचा विश्वास व्यक्त केला. या मतदानात ग्रामीण मतदाराचा जास्त सहभाग राहत नाही. तो मतदार आम्ही वळवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचाही फायदा आम्हाला मिळणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हेही वाचंलत का? 

SCROLL FOR NEXT