नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा: पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात ( Porn movie racket case ) अडकलेली अभिनेत्री गहना वशिष्ट हिला तिसर्या एफआयआरवरुन अटक केली जाऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात ( Porn movie racket case ) गरज भासेल तेव्हा तपासात पोलिसांना सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने गहनाला दिले आहेत.
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश करणे तसेच कोणकोणत्या ओटीटी कंपन्या पॉर्न फिल्मस्ची विक्री करीत आहेत, याचा शोध घेण्यासाठी गहनाची कोठडी हवी असल्याचे पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आले होते. आतापर्यंत दोन एफआयआरमध्ये गहनाला जामीन मिळालेला आहे. तर आता तिसर्या एफआयआयवरुन तिला अटक केली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईच्या पोलिसांच्या गुन्हे शाखेने गहनाविरोधात तिसरा गुन्हा दाखल केला होता. गहनाने आतापर्यंत तुरुंगात 133 दिवस काढले आहेत, याकडेही सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे.
हेही वाचलं का?