पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई पॅरा गेम्समध्ये पूजाने थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. महिलांच्या F54/F55 डिस्कस थ्रो इव्हेंटमध्ये १८.१७ मीटर थ्रोसह तिने ही कामगिरी केली.
संबंधित बातम्या :
टेबल टेनिस पुरुष एकेरीमध्ये संदीप डांगीने ४ पैकी २ सामने जिंकून कांस्यपदक मिळवले. तर भारताच्या हॅनीने पुरुषांच्या भालाफेक F37 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने ५५.९७ मीटर थ्रो फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 मध्ये नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांनी कांस्यपदक जिंकले आहे. भारताच्या श्रेयांश त्रिवेदीने पुरुषांच्या २०० मीटर टी -३७ धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. २५.२६ सेकंदात त्याने ही कामगिरी केली. पुरुषांच्या २०० मीटर टी ३५ धावण्याच्या स्पर्धेत नारायण ठाकुरने २९.८३ सेकंद नोंदवत आज भारतासाठी कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला.
आशियाई पॅरा गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्येही खाते उघडले. टेबल टेनिस महिला एकेरी – वर्ग ४ क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. भालाफेकमध्ये भारताच्या सुमित अंतिलने इतिहास रचला. पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदकावर नाव कोरले.
हेही वाचा :