Latest

न्‍यूयॉर्क मेट्रो स्‍टेशनवर गोळीबार करणार्‍याची ओळख पटली, माहिती देणार्‍यास ५० हजार डॉलरचे बक्षीस

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
न्‍यूयॉर्क मेट्रो स्‍टेशनवर अंदाधूंद गोळीबार करणार्‍याची ओळख पटली आहे. हल्‍लेखोराचे नाव फ्रँक जेम्‍स असून तो ६२ वर्षांचा आहे. पोलिसांनी त्‍याचे छायाचित्र प्रसिद्‍ध करत माहिती देणार्‍याला ५० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.

न्‍यूयॉकमधील ब्रुकलीन मेट्रो स्‍टेशनमध्‍ये मंगळवार (दि.१२ ) सकाळी अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली. रेल्‍वेचे डबे बंद होताच त्‍याने बॉम्‍बही फेकला होता. हल्‍लेखोराचे नाव फ्रँक जेम्‍स असून तो ६२ वर्षांचा आहे. पोलिसांनी त्‍याचे छायाचित्र प्रसिद्‍ध करत माहिती
देणार्‍याला ५० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.

या हल्‍ल्‍यासंदर्भात माहिती देतान न्‍यूयॉर्कमधील अग्‍निशमन दलाचे प्रवक्‍त्‍याने माहिती दिली की, ३६ स्‍ट्रीट स्‍टेशनमधून धुराचे लोट येत असल्‍याची माहिती मिळाली. मात्र रेल्‍वे स्‍टेशनवर पोहचल्‍यावर रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेल नागरिक होते. या घटनेनंतर तत्‍काळ या
स्‍टेशनवरील सर्व रेल्‍वेसेवा बंद करण्‍यात आली. न्‍यूयॉर्क पोलिसांच्‍या कमांडो टीमने स्‍टेशनने वेढा देत परिस्‍थिती नियंत्रणात आणली.
या हल्‍लाबाबात प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले की, रेल्‍वे स्‍टेशनवर प्रथम बॉम्‍बस्‍फोटाचा आवाज आला. यानंतर अंदाधूंद गोळीबार सुरु झाला. एकच खळबळ माजली. प्रवाशी जीव वाचविण्‍यासाठी पळत सुटल्‍याने चेंगराचेंगरी झाली. गोळीबारात अनेक जण जखमी झाले. हल्‍लेखोराने हा बांधकाम कामगाराच्‍या ड्रेसमध्‍ये चेहर्‍यावर मास्‍क लावून होता. त्‍याच्‍या पाठीवर एक सिलिंडरही होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT