Russia Ukraine War : युक्रेनचे दोन शस्त्र डेपो उद्ध्वस्त

Russia Ukraine War : युक्रेनचे दोन शस्त्र डेपो उद्ध्वस्त
Published on
Updated on

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) लवकरच 50 दिवस पूर्ण होत आहेत, तत्पूर्वी मंगळवारी 46 व्या दिवशी रशियाने युक्रेनचे आणखी दोन शस्त्र डेपो उद्ध्वस्त केले. खमेलनित्स्की आणि कीव्ह येथे हे दोन शस्त्रडेपो होते. रशियन क्षेपणास्त्रांनी त्यांचा वेध घेतला, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, युक्रेनच्या लष्कराने रशियाचे आतापर्यंत 19 हजार 500 सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तसेच रशियाचे 732 रणगाडे आणि 157 लढाऊ विमाने निकामी केल्याचेही युक्रेनने म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनचे सैन्य सध्या युक्रेनच्या पूर्वेकडील बाजूत एकत्र होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे यापूर्वीच स्थलांतर सुरू झाले आहे.

लिथुआनियाच्या पंतप्रधान इंग्रिडा सिमोनीटे यांनी कीव्हजवळील बोरोड्यांका येथील दौरा केला. येथे बचाव पथकाला ढिगार्‍याखाली अनेक मृतदेह आढळून आले. दौर्‍यात अनुभवलेल्या भयानक परिस्थितीची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. रशियाने जो नरसंहार केला आहे, त्यासाठी रशियावर मोठी कारवाई झाली पाहिजे.

युक्रेनमध्ये पुढील तीन महिन्यांत 80 हजार बालकांचा जन्म 

युद्धाला सुरुवात झाली तेव्हा युक्रेनमध्ये 2.65 लाख महिला गर्भवती होत्या. यातील 80 हजार बालकांचा जन्म आगामी तीन महिन्यांत होणार आहे. पण, सध्याच्या परिस्थितीनुसार गर्भवतींना थंड आणि दुरवस्था झालेल्या तळघरात किंवा अत्यंत गर्दी असलेल्या सब-वे स्थानकांत प्रसूती करावी लागणार आहे.

रशिया-युक्रेन युद्ध 46 वा दिवस (Russia Ukraine War) 

* युक्रेनच्या आजोव्ह रेजिमेंटने दावा केला आहे की, रशियाने मारियुपोल येथे रासायनिक पदार्थांचा वापर केला. त्यामुळे सैनिकांना श्‍वासोच्छ्वासात अडचणी जाणवू लागल्या.
* फ्रान्सने रशियाच्या 6 अधिकार्‍यांना काढून टाकले.
* रशियाच्या हल्ल्यात 10 हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मारियुपोलचे महापौरी वादिम बॉयचेन्को यांनी माहिती दिली.
* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे कीव्हचा दौरा करणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याने दिली आहे.
* युरोपीय संघाने रशियाविरोधात जे निर्बंध लावले आहेत ते अत्यंत कमकुवत आहेत, असे मत पोलंडच्या पंतप्रधानांनी व्यक्‍त केले आहे.
* माजी राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांच्या सरकारमध्ये कार्यरत असलेल्या रशियन एजंटना ताब्यात घेतल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
* ऑस्ट्रेलियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांनी मॉस्कोत पुतीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जोपर्यंत युक्रेनी नागरिक मरत आहेत, तोपर्यंत रशियावर निर्बंध कायम राहतील, असे ठणकावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news