Latest

PM Kisan Nidhi Yojana : शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिवाळी भेट; आज जमा होणार १५ वा हप्ता

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात पीएम किसान योजनेची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते.

आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना १४ हप्ते मिळाले आहेत. आज १५ वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११:३० वाजता १५ वा हप्ता खुंटी, झारखंड येथून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पाठवले जातील.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT