Stock Market Opening Bell | दिवाळीत सेन्सेक्सची रॉकेट भरारी, ६०० अंकांनी वधारला, ‘हे’ घटक ठरले महत्त्वाचे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक मजबूत संकेतांमुळे शेअर बाजाराने आज बुधवारी (दि. १५) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढून ६५,५३५ वर पोहोचला. तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून १९,६३० वर व्यवहार करत आहे. सर्व क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. बाजारातील तेजीला बँकिंग, आयटी आणि मेटल क्षेत्रामुळे सपोर्ट मिळाला आहे. (Stock Market Opening Bell)

सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, इन्फोसिस, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले आहेत. तर पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे. सेन्सेक्सवरील ३० पैकी २९ शेअर्स तेजीत आहेत. तर केवळ १ शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

निफ्टीवर हिंदाल्को इंडस्ट्रीज, कोल इंडिया, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील आणि अदानी एंटरप्रायझेस हे वधारले आहेत, तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये घसरण दिसून आली आहे. (Stock Market Opening Bell)

निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि निफ्टी मेटल सारखे हेवीवेट निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात वेगाने वाढले आहेत. निफ्टी मेटल जवळपास २ टक्क्यांनी वाढला तर निफ्टी आयटी सुमारे १.८ टक्क्यांनी वाढला. निफ्टी रियल्टी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये टॉप गेनर राहिला. हा निर्देशांक सर्वाधिक २.३ टक्क्यांनी वाढला.

आशियाई बाजारात तेजी

आशियाई बाजारात तेजीचे वातावरण आहे. कारण स्थिर अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांची भावना अशी झाली आहे की फेडरल रिझर्व्ह पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला व्याजदरात कपात सुरू करू शकते. या पार्श्वभूमीवर जपानचा निक्केई १.८ टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातील नॅस्डॅक २.४ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

तेलाच्या किंमती वाढल्या

दरम्यान, मध्य पूर्व तणाव आणि कमकुवत डॉलरमुळे बुधवारी सुरुवातीच्या आशियातील व्यवहारात तेलाच्या किमती वाढल्या. ब्रेंट फ्यूचर्स प्रति बॅरेल ८२.६९ डॉलरवर गेले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news