बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी शासनाचे प्रयत्न : उद्योग मंत्री उदय सामंत

बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी शासनाचे प्रयत्न : उद्योग मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्यासाठी व देशासाठी अतिशय महत्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा एक उत्पादन सारख्या व्यापारांना चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ४२ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटना प्रसंगी केले.
राज्यातील स्टार्टअप्स, बचत गट तसेच एक जिल्हा एक उत्पाद सारख्या व्यापारांना  कायमस्वरुपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नरत असल्याचेही ते म्हणाले. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदान येथे ४२ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याला आजपासून सुरुवात झाली. २७ नोव्हेंबरपर्यंत हा मेळावा चालणार असुन ′वसुधैव कुटुंबकम- युनिटी इन ट्रेड' ही या मेळाव्याची यंदाची थीम  आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी या मेळाव्याचे उद्घाटन  झाले. या वर्षी या मेळाव्यात २८ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि १३  देश सहभागी झाले असून ३५०० उद्योजक सहभागी झाले आहेत. दरम्यान, या मेळाव्यात उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या दालनातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन, त्यांच्या उत्पादनाबाबती माहितीही जाणून घेतली.
दरम्यान, महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र सदन येथे पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्र दालनाच्या उभारणी विषयी तसेच सहभागी झालेल्या स्टॉल्सबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र दालनाची उभारणी पहिल्यांदाच मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातील स्टार्टअप्सला गती देण्याचे धोरण, एक जिल्हा एक उत्पादन योजना, गुंतवणूक आणि व्यापाराला चालना देणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र दालनाचे वैशिष्ट्ये

महाराष्ट्र दालनातील गाळ्यांमध्ये कोल्हापूरी चपला, पैठणी साडी, चामड्यांच्या वस्तु, घर सुशोभीकरणाच्या वस्तु, एक जिल्हा एक उत्पाद उत्पादने, काथ्या पासून बनविलेल्या विविध वस्तु तसेच विविध बचत गटातील महिलांनी बनविलेले खाद्य मसाले पदार्थ, इत्यादी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी या मेळाव्यात ठेवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news