Latest

जुन्या वाहनांवर ‘फिटनेस’ प्रमाणपत्र नसल्यास आता जागेवर जप्तीची कारवाई !

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा : जुन्या गाड्या वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी आता गाड्यांच्या काचेवर फिटनेस मसुदा जारी करण्यात आला आहे. मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये सर्व पक्षांकडून 30 दिवसांच्या आत हरकती/सूचना मागविण्यात आल्या आहेत.

कसे असेल याचे स्‍वरूप ? 

जुन्या वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्राचे स्वरूप विंड शील्डवर चिकटवले जाईल. या नमुन्यात, फिटनेस प्रमाणपत्राची वैधता तारीख-महिना-वर्ष लिहिली जावी, तसेच वाहनांच्या नोंदणी क्रमांकासह खाली लिहावे. फिटनेस प्रमाणपत्राचे स्वरूप दोन प्रकारे तयार केले गेले आहे. जड वाहनांसाठी वेगळे आणि लहान वाहनांसाठी वेगळे.

प्रवासी वाहनांच्या डाव्या बाजूला प्रमाणपत्र लावले जाईल 

याशिवाय अवजड, मध्यम आणि लहान मालाच्या वाहनांवर म्हणजेच प्रवासी वाहनांवर हे प्रमाणपत्र विंड शील्डच्या डाव्या बाजूला लावावे लागेल. या वाहनांना त्यांच्या वाहनांच्या पुढील काचेवर निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या रंगात लिहावे लागेल.

याशिवाय लहान वाहने, ई-रिक्षा वाहनांवरही फिटनेस प्रमाणपत्र लावणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ज्या वाहनांमध्ये विंडशील्ड म्हणजेच समोरचा आरसा नाही, अशा वाहनांच्या बॉडीवर हे प्रमाणपत्र लावणे बंधनकारक असेल, जिथून ते सहज पाहता येईल किंवा ते नीट दिसेल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन नियमासाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. सध्या, 1 महिन्यासाठी जनता आणि भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत, त्यानंतर सरकार हा नियम लागू करेल. शासनाच्या या निर्णयात 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी खासगी वाहने रस्त्यावरून हटवण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

आकडेवारीवर नजर टाकली तर देशात 20 वर्षांपेक्षा जुनी 51 लाख हलकी मोटार वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी 34 लाख वाहने चालवली जात आहेत. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना जबर दंड आकारण्याची तरतूदही सरकार करत आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT