Russia-Ukraine war : टोयोटा आणि होंडा या कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय, रशियासोबत व्यवसाय करणे केले बंद

Russia-Ukraine war : टोयोटा आणि होंडा या कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय, रशियासोबत व्यवसाय करणे केले बंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : मागच्या ८ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) संघर्ष सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. जपानी कार निर्माता कंपनी टोयोटा (Toyota) आणि होंडा (Honda) यांनी रशियासोबत व्यवसाय करण्याचे बंद केले आहे.

युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर रशियासोबतचा व्यवसाय सोडून देण्याबाबत ऑटोमोटिव्ह ब्रँड्सच्या कंपन्यांची यादी वाढताना दिसत आहे. कच्च्या तेलापासून ते सोन्यापर्यंत सर्वच वस्तू महागल्या आहेत. दरम्यान रशिया, युक्रेन युद्धाचा मोठा फटका हा भारतामध्ये वाहन (Vehicles) खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

टोयोटा आणि होंडा हे दोन्ही आता त्या यादीचा भाग आहेत, ज्यांनी रशियासोबत व्यवसाय करण्याचे बंद केले आहे. या यादीमध्ये Volvo, Volkswagen (Folkswagen), Harley-Davidson, GM, Daimler सारख्या ऑटोमोटिव्ह कंपन्यांचा समावेश आहे.

टोयोटा मोटर कॉर्प (Toyota Motor Corp) ने रशियाला वाहनांची शिपमेंट थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच सेंट पीटर्सबर्ग येथील त्यांच्या प्लांटमध्ये उत्पादन थांबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. टोयोटा या प्लांटमध्ये RAV4 आणि Camry मॉडेल्स तयार करते.

टोयोटा युक्रेनमधील लोकांच्या सुरक्षेसाठी युक्रेनमधील घडामोडींवर मोठ्या चिंतेने पाहत आहे आणि शांतता जलद प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहे," कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. आणि आवश्यकतेनुसार आवश्यक निर्णय घेईल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news