माणसाला मृत्यू येण्यापूर्वी ३० सेकंद आधी नेमके काय घडते ? अखेर माहिती आली समोर !

माणसाला मृत्यू येण्यापूर्वी ३० सेकंद आधी नेमके काय घडते ? अखेर माहिती आली समोर !

न्यूयॉर्क; पुढारी ऑनलाईन : माणसाला आयुष्यभर ज्या गोष्टींचे कुतुहल वाटत असते त्यामध्ये साक्षात मृत्यूचाही समावेश आहे. मृत्यूवेळी नेमके काय घडते याचे सर्वसामान्यांपासून ते संशोधकांपर्यंत सर्वांनाच कुतुहल असते. याबाबत वेळोवेळी काही संशोधनेही झालेली आहेत. आता अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या एका संशोधनानुसार मृत्यूपूर्वी तीस सेकंद आधी मेंदूत तीव्र प्रकाश कोंदाटतो.

वैज्ञानिकांनी त्याला 'लास्ट रिकॉल' म्हणजेच 'आयुष्यातील शेवटची आठवण' असे नाव दिले आहे. अलीकडेच डॉक्टरांनी एका 87 वर्षांच्या व्यक्‍तीच्या मेंदूचे स्कॅनिंग केले. या व्यक्‍तीचा हॉस्पिटलमध्येच हार्टअ‍ॅटॅकने मृत्यू झाला. ज्यावेळी त्याच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले त्यावेळी मृत्यूपूर्वी तीस सेकंद आधी त्याच्या मेंदूत तीव्र प्रकाश निर्माण झाला जो संबंधित व्यक्‍तीनेही पाहिला. मेंदूमध्ये रक्‍तप्रवाह थांबल्यानंतर काही मिनिटांनीही हे बदल घडत राहतात.

लुईसवील युनिव्हर्सिटीचे डॉ. अजमल जेमर यांनी सांगितले की मानवी मेंदू ही एक अतिशय गुंतागुंतीची गोष्ट आहे. या नव्या शोधामुळे न्यूरो सायन्सच्या क्षेत्रात बरीच मदत मिळू शकते. मेंदूच्या कार्याला समजून घेण्यासाठी तसेच रुग्णांवरील उपचारासाठी नव्या पद्धती शोधल्या जाऊ शकतात. सक्सेस युनिव्हर्सिटीचे प्रा. अनिल सेठ यांनी सांगितले की हा डेटा अतिशय अनोखा आहे. मृत्यूच्या काही सेकंद आधी मेंदूमध्ये काय घडत असते हे यामधून दिसून येते.

गेल्या दशकभरापासून अशा संशोधनासाठी प्रयत्न सुरू होते. संशोधक डॉ. जेमर यांनी सांगितले की मृत्यूपूर्वी मेंदूत तीवजए प्रकाश निर्माण होण्यामागे अल्फा आणि गॅमा लहरी कारणीभूत होतात. रक्‍तपुरवठा थांबल्यावर या लहरी काही सेकंद सक्रिय राहतात. याबाबत आणखी संशोधन गरजेचे आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news