बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल जय, विशाल, आणि दादूस सेफ आहेत असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. नीथा शेट्टी-साळवी (Neetha Shetty), सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघांमधून कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा (Neetha Shetty) आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले. महेश मांजरेकरांनी सांगितले. नीथा शेट्टी – साळवी हिला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बालदिन साजरा झाला. यानिमित कलर्स मराठी परिवरातील दोन चिमुकल्या सदस्यांनी सदस्यांची भेट घेतली. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कृष्णप्पा आणि सोमनाथ या दोघांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. लहानपणीच्या गोड आठवणी सदस्यांनी सांगितल्या.
बिग बॉसची चावडी सदस्यांच्या धम्माल नकलांनी रंगली. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे मीनलने सांगितली. दादूस, विकास आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.
कसा असणार नवा आठवडा? कोणते सदस्य होणार नॉमिनेट? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
नीथाने घरात एंट्री केल्यानंतर तेथील स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. कारण, नीथा इंडस्ट्रीतील एक प्रसिध्द नाव आहे आणि तिचे फॅन फॉलोइंगदेखील अधिक आहेत. इन्स्टाग्रामवर नीथाचे १ लाख ९६ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
नीथाने धुंड लेगी मंजिल हमें या मालिकेत तिने आरतीची भूमिका साकारली होती. एक दिन अचानक, प्यार की एक कहाणी, ससुराल सिमर का, सियासत, एमटीव्ही बिग एफ यासारख्या टीव्ही मालिका आणि शोमधून तिने काम केलंय.'तेनाली रमण', 'घरी की लक्ष्मी बेटियाँ', 'परावतार श्री कृष्ण' अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय.
तेनाली रमणमधील तिची भूमिका चांगली गाजली होती. नीथा उत्कृष्ट नृत्यांगना, अभिनेत्री व मॉडेल आहे. 'फुगे' या चित्रपटातून नीथाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
नीथाने आतापर्यंत २९ मालिका आणि ४ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. सोबतच ती काही वेब सीरिजमध्ये दिसली होती. 'गंदी बात-४ 'मध्ये तिने खूप बोल्ड सीन दिले आहेत.