कार्तिकी एकादशी : विठ्ठल मंदिरात ५ टन फुलांची आकर्षक सजावट | पुढारी

कार्तिकी एकादशी : विठ्ठल मंदिरात ५ टन फुलांची आकर्षक सजावट

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

कार्तिकी एकादशी च्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे. त्याची जय्यद तयारी पंढरपुरात सुरु झाली आहे. या वर्षी विठ्ठल मंदिराला एकुण 5 टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचे स्वरूप मनमोहक दिसत आहे.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 15 प्रकारच्या एकुण 5 टन फुलांचा सजावटीकरिता वापर करण्यात आला आहे.

पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभूळकर हे गेल्या 5 वर्षांपासून विठ्ठलाची सेवा म्हणून सजावट करतात. या कार्तिकी यात्रेत 5 टन फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आल्याचे राम जांभूळकर यांनी सांगितले. फुलांच्या या सजावटीसाठी साधारण 30 ते 40 कामगारांनी सेवा बजावली आहे.

 

Back to top button