Latest

NEET PG: जुन्या पॅटर्नप्रमाणे होणार नीट सुपरस्पेशालिटी पीजी परीक्षा!

रणजित गायकवाड

NEET PG : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची म्हणजे नीट सुपरस्पेशालिटी पीजी परीक्षा जुन्या पॅटर्नप्रमाणे घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी दिले. पुढील वर्षापासून नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेतली जाईल, असे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सुनावणीदरम्यान मान्य केले. केंद्राच्या या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे.

नीट सुपर स्पेशालिटी ( NEET PG ) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा पॅटर्न ऐनवेळी बदलण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. केवळ रिकाम्या जागा भरण्यासाठी अचानक नवीन पॅटर्नचा अवलंब केला आहे की काय, अशी शंका येते, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने परिक्षा दोन महिन्यांसाठी टाळण्याची केंद्राची विनंती फेटाळून लावत जुन्या पॅटर्नप्रमाणेच परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. सरकारने जुन्या पॅटर्नप्रमाणे परीक्षा घ्याव्यात, अन्यथा कायद्याचे हात लांब आहेत, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. वैद्यकीय क्षेत्र हे व्यवसायासारखे झाले आहे, असे वाटते. पण वैद्यकीय शिक्षणही हाही व्यवसायच झाला आहे का? असा सवाल न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला उद्देशून उपस्थित केला.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT