Latest

Besharam Rang: दीपिकाच्या बिकिनी रंगावर वाद, भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री यांचा इशारा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर पठाण (Besharam Rang) हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या डान्स स्टेप्सला ट्रोल केले जात आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर वेशभूषा न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा की नाही याचा विचार करू, असे सांगितले आहे. (Besharam Rang)

या गाण्यात दीपिका पदुकोण खूपच बोल्ड आणि मादक अदा आहेत. दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर युजर्स तिच्यावर टीका करत आहेत. त्याचवेळी या गाण्यावर जैन यांच्या मरिबा गाण्याची धून चोरल्याचा आणि मादक डान्स स्टेप्स चोरल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये या चित्रपटाच्या रिलीजवरून वाद उद्भवला असून पठाण अडचणीत सापडला आहे.

काय म्हणाले नरोत्तम मिश्रा?

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, गाण्यात वापरण्यात आलेली वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह आहे. भ्रष्ट मानसिकतेमुळे हे गाणे चित्रित करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मी विनंती करेन की दृश्ये निश्चित केली पाहिजेत. वेशभूषा निश्चित करा, अन्यथा मध्य प्रदेशात हा चित्रपट रिलीज करायचा की नाही, याचा विचार करु.

दीपिकाच्या भडक कपड्यांबद्दल सोशल मीडियावर आक्षेप घेतला जात आहे. सोशल मीडिया यूजर्सनी शाहरुख खानवर भगव्या रंगाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. एका युजरने लिहिले की, "शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' पवित्र भगव्या रंगाला 'बेशरम रंग' म्हणून दाखवत आहे. एकीकडे शाहरुख खान माता वैष्णोदेवीकडे जात आहे, तर दुसरीकडे अश्लील दृश्ये चित्रित करत आहेत.

बॉयकॉट पठाण हॅशटॅगचे समर्थन करताना भाजप नेते अरुण यादव यांनीही शाहरुखवर हल्लाबोल केला आहे. अन्य काही युजर्सनी चित्रपटाचे नाव, दीपिकाचा ड्रेस आणि गाण्याचे बोल यारून भगवा रंगाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. एका युजरने लिहिले की, या चित्रपटावर बहिष्कार टाकला पाहिजे.

दरम्यान, स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही शाहरुखच्या या चित्रपटातील गाण्याबाबत तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय – पठानमध्ये भगवा आणि हिंदू संस्कृतचा अपमान झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT