Latest

Narendra Modi And Joe Biden : ‘तुमच्‍यासाठी मीही काही कागदपत्रे आणली आहेत’

नंदू लटके

वॉशिंग्‍टन ; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी त्‍यांनी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांची ( Narendra Modi And Joe Biden ) भेट घेतली. यावेळी दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये उत्‍स्‍फूर्त संवाद झाला. अमेरिकेत झालेल्‍या उस्‍त्‍फूर्त स्‍वागताबद्‍दल नरेंद्र मोंदी यांनी बाडयेन यांचे आभार मानले. दोन्‍ही नेत्‍यांनी या वेळी माध्‍यमांशी संवाद साधताना एक मजेशीर किस्‍सा झाला. बायडेन यांच्‍या व्‍यक्‍तिगत नावाविषयी झालेल्‍या चर्चेत मोदींनी दिलेल्‍या उत्तराने बायडेन यांच्‍यासह संपूर्ण हॉलमध्‍ये हस्‍याचे फवारे उडाले.

नरेंद्र मोदी आणि जो बायडेन ( Narendra Modi And Joe Biden ) यांनी माध्‍यमांसमोर संवाद साधला. हा औपचारिक संवाद काहीसा मनमोकळा झाला. बायडेन यांनी २००६मध्‍ये केलेल्‍या भारत दौर्‍याची आठवण सर्वांना शेअर केली. या वेळी मोदींनी दिलेल्‍या हजरजबाबी उत्तरामुळे हॉलमधील वातावरण प्रपुल्‍लित झाले.

बायडेन यांना भारत दौर्‍याचे स्‍मरण

यावेळी बायडेन यांना २००६मधील भारत दौर्‍याचे स्‍मरण झाले. ते म्‍हणाले, त्‍यावेळी मी अमेरिकेचा उपराष्‍ट्राध्‍यक्ष होतो.

भारत दौर्‍यावर असताना मी मुंबईला भेट दिली होती. भारतात तुमचे कोणी नातेवाईक आहेत का, असा सवाल त्‍यावेळी पत्रकारांनी मला केला होता.

तेव्‍हा मी म्‍हणाले होती की, मला नाहीत नाही; पण १९७२ मध्‍ये मी २९ वर्षांचा असताना मला मुंबईतील एका व्‍यक्‍तीचे पत्र आले होते.

त्‍यांनी म्‍हटले होते की, माझेही आडनाव बायडेन असे आहे. मात्र यापुढे माझा त्‍यांच्‍याशी संपर्क होवू शकला नाही. भारत दौर्‍यावर असताना भारतातील पत्रकारांनी मला सांगितले होते की, येथे पाच जणांचे आडनाव बायडेन असे आहे.

याबाबत मला काही दिवसांनी माहिती मिळाली की, भारतात १८व्‍या शतकामध्‍ये ईस्‍ट इंडिया टी कंपनी होती.

या कंपनीत जॉर्ज बायडेन होते. जॉर्ज यांनी भारतातील महिलेबरोबर विवाह केला होता.

त्‍यामुळे भारतातील काही जणांचे आडनाव हे बायडेन होते. मात्र त्‍यांनी मी कधीच भेटू शकलो नाही.

तर या बैठकीचा हेतू हा आहे की, भारतीत बायडेन आडनावाच्‍या कुटुंब शोधण्‍यात तुम्‍ही मला मदत करावी, अशी कोपरखळीही त्‍यांनी मारली.

पंतप्रधान मोदींचा हजरजबाबीपणा

बायडेन यांनी सांगितलेल्‍या आठवणीवर पंतप्रधान मोदी यांनी तत्‍काळ हजरजबाबीपणा उत्तर दिले.

ते म्‍हणाले, तुम्‍ही भारतातील बायडेन आडनाव असणार्‍या लोकांचा उल्‍लेख केला. तुम्‍ही माझ्‍याशी चर्चा करतानाही याचा उल्‍लेख केला होता. मीही यासंदर्भातील काही कागदपत्र शोधण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

ही कागदपत्रे ही सोबत घेवून आला आहे. असेही होईल की, तुम्‍हाला या कागदपत्राचा तुम्‍हाला उपयोग होईल, मोदींच्‍या या उत्तराने दोन्‍ही नेत्‍यांसह संपूर्ण हॉलमध्‍ये हास्‍याचे फवारे उडाले.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT