पंतप्रधानांचे ‘इंडिया वन’ विमान आहे अत्यंत खास या आहेत सुविधा | पुढारी

पंतप्रधानांचे ‘इंडिया वन’ विमान आहे अत्यंत खास या आहेत सुविधा

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले विशेष विमान इंडिया वन मधून अमेरिकेला गेले आहेत. सुरक्षा आणि कम्युनिकेशन प्रणालीच्या बाबतीत हे विमान अत्यंत खास आहे. पंतप्रधान मोदी यांचे बोईंग 777 हे अत्यंत अत्याधुनिक आणि नवे विमान आहे.

अमेरिकेकडून हे इंडिया वन विमान गेल्या ऑक्टोबरमध्येच मिळाले होते. भारताने अशी दोन विमाने गतसाली अमेरिकन बोईंग कंपनीकडून खरेदी केली आहेत. हे दोन इंजिन असलेले विमान असून त्यामध्ये अत्यंत शक्तिशाली समजले जाणारे जीई-90 या इंजिनचा वापर करण्यात आले आहे.

विमानाची अंतर्गत सजावटही अत्यंत खास असून बाहेर विमानावर एका बाजूला हिंदीत भारत आणि इंडिया असे लिहिण्यात आले आहे. पंतप्रधानांशिवाय या विमानाचा वापर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीही करू शकतात.

एकदा इंधन भरल्यावर हे विमान 17 तास उड्डाण भरू शकते. प्रसंगी या विमानात हवेतच इंधन भरले जाऊ शकते. सुरक्षा आणि संचार प्रणालीबाबत हे विमान अत्यंत आधुनिक आहे. यामध्ये लावण्यात आलेली प्रणाली ही विमानाला कोणत्याही हल्यापासून वाचवू शकते.

याशिवाय एखाद्या क्षेपणास्त्राची दिशाही वळवू शकते. याशिवाय इंडिया वन हे मिसाईल सिस्टीमनेही सज्ज आहे. यापासून विनाविलंब क्षेपणास्त्र हल्लाही केला जाऊ शकतो.

तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे हे विमान उड्डाणादरम्यान शत्रूच्या रडारला जामही करू शकते. विमानात कॉन्फरन्स रूम, शयन कक्ष, व्हीव्हीआयपी पॅसेंजर कक्ष, मेडिकल सेंटरची सुविधाही उपलब्ध आहे

 

Back to top button