Latest

Saraswati Das : बंगाली चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का, १८ वर्षीय मॉडेलची आत्महत्या

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बंगाली चित्रपटसृष्टीत एकामागून एक मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. गेल्या १५ दिवसांत ३ अभिनेत्रींच्या गूढ मृत्यूनंतर आता एका मॉडेलच्या मृत्यूची बातमी आली आहे. (Saraswati Das ) १८ वर्षीय स्ट्रगलिंग मॉडेल सरस्वती दास हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  (Saraswati Das)

सरस्वती दासचा मृतदेहही तिच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सरस्वती दास या कोलकात्यातील कसबा परिसरात राहत होती. रविवारी तिचा मृतदेह घरात आढळून आला. सरस्वती दास हिच्याप्रमाणेच बिदिशा मजुमदार, पल्लवी डे आणि मंजुषा नियोगी यांनीही  त्यांच्या घरात गळफास लावून घेत आत्‍महत्‍या केल्‍याचे आढळले होते. या तिघांच्याही बाबतीत प्राथमिक तपासात नैराश्य आणि फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे.

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सरस्वतीच्या आजीने तिचा मृतदेह पाहिला. तिला रुग्णालयात नेले. मात्र सरस्वती दास हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती दास तिच्या आजीसोबत (नानी) राहत होती. कुटुंबातील इतर सदस्य बाहेर गेले होते. पहाटे २ वाजता आजी झोपेतून उठली. यावेळी खोलीत सरस्वती  नसल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. त्‍या सरस्वतीच्या खोलीत गेल्‍या, तेव्हा तिने गळफास घेतला होता.

सरस्वती गेल्या १७ वर्षांपासून नानीच्या घरी आईसोबत राहत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. सरस्वतीने दहावीनंतर शिक्षण सोडले. ती मुलांना शिकवायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मॉडेलिंगही करायची. गेल्या काही दिवसांपासून सरस्वती आपल्या नात्याबद्दल डिप्रेशनमध्ये होती, असे सांगितले जात आहे. सरस्वतीच्या मृत्यूचे कारण नैराश्य आणि तणाव आहे की आणखी काही, याचा पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.