Chakda Express : विराटनंतर अनुष्काही उतरली क्रिकेटच्या मैदानात | पुढारी

Chakda Express : विराटनंतर अनुष्काही उतरली क्रिकेटच्या मैदानात

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा (९७३ ) विराट कोहलीच्या नावावर आहेत. दरम्यान, तर आता विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील किक्रेटच्या मैदानात उतरली आहे. (Chakda Express) बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ (Chakda Express ) चित्रपटाच्या शूटिंगसाठी क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २०० विकेट्स घेणाऱ्या आणि जगातील सर्वात वेगवान महिला गोलंदाज ‘झुलन गोस्वामी’ ची भूमिका साकारत आहे. यासाठी अनुष्का कडक उन्हाळ्यात ४५ अंश डेग्री तापमानात गेल्या काही दिवसांपासून कडी मेहनत घेत आहे. यासोबत ती पती आणि क्रिकेटर विराट कोहलीकडून किक्रेटच्या टिप्स शिकत आहे. याबाबतची माहिती अनुष्काने स्वत: सोशल मीडियावर दिली आहे.

अनुष्काच्या इंन्स्टाग्रामवरील व्हिडिओत ती किक्रेटच्या मैदानात सराव करताना दिसत आहे. यावेळी अनुष्काने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि ब्लॅक रंगाच्या ट्रॅक पॅंन्ट परिधान केली आहे. याशिवाय व्हिडिओत ती गोलदांजी आणि बॅटिंग करतानादेखील दिसतेय. यावेळी अनुष्काच्या केसांची पोनी स्टाईल आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

‘चकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामी याचा बायोपिक आहे. अनुष्का शर्मा या चित्रपटात झुलन गोस्वामीची मुख्य भूमिका साकारत आहे. ‘चकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होत आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button