Latest

Rahul Gandhi and Mayawati : मायावतींनी निवडणूक का लढवली नाही?, राहुल गांधी म्‍हणाले, “ईडी…”

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच सीबीआयचा दबाब,भीतीपोटी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवली नाही,असा दावा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी केला. दिल्लीतील जवाहर भवन येथे आयोजित 'द दलित ट्रुथ' या पुस्काच्या विमोचन सोहळ्यात ते बोलत होते. ( Rahul Gandhi and Mayawati )

Rahul Gandhi and Mayawati : मायावतींना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी हाेती

यावेळी राहुल गांधी म्‍हणाले, कॉंग्रेसने मायावतींना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी दर्शवली होती.तसा निरोप देखील त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला होता.परंतु, केंद्रीय तपास यंत्रणांच्या दहशतीमुळे त्यांनी निरोपाला साधे उत्तर देखील दिले नाही. संविधान लागू करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थांशिवाय संविधानाचे महत्व नाही; पंरतु, आता देशातील सर्व संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आहेत. त्यामुळे मायावती ईडी, सीबीआयच्या दहशतीखाली आहे. कांशीराम यांनी दलितांना आवाज दिला. त्यांना जागृत केले. पंरतु, आज दलितांसाठी मायावती लढत नाही, असा दावा देखील त्यांनी केला.

संविधानावर हल्ल्याचा परिणाम दुबळ्या नागरिकांवर

गोळ्या झाडून महात्मा गांधी यांची जेव्हा हत्या करण्यात आली होती तेव्हाच संविधानावर हल्ले सुरू झाले. आज पेगासस, सीबीआय सारख्या संस्था संविधानापासून परावृत्त करीत आहेत. जनतेच्या आतून जोपर्यंत आवाज निघणार नाही, तोपर्यंत संविधान आपले काम करू शकत नाही. संविधानावर होणारे प्रत्येक हल्ल्याचा परिणाम देशातील दुबळ्या नागरिकांवर पडतो. देशाची अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीची स्थिती सर्वांसमोर आहे. याचा सामना करण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यावर मार्गक्रम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यानिमित्ताने केले.

जगातील एकमेव भारत असा देश आहे जिथे अजूनही अस्पृश्यता आहे. देशाला यातून बाहेर निघण्याची गरज आहे. नि;स्वार्थ प्रेम मिळाल्याने देशाचे मोठे कर्ज माझ्यावर आहे. त्यामुळे देशाला समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र, मला अनेक जोडे देखील मारले आहे. याने खिन्न झालो.पंरतु, देश मला काहीतरी शिकवून इच्छितो आहे,असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: 

SCROLL FOR NEXT