Corona Updates : कोरोना रुग्णसंख्येत वाढ; दिवसभरात १ हजार १५० कोरोनाग्रस्तांची भर | पुढारी

Corona Updates : कोरोना रुग्णसंख्येत वाढ; दिवसभरात १ हजार १५० कोरोनाग्रस्तांची भर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात १ हजार १५० कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ८३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान दिवसभरात १ हजार १९४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६%, तर दैनंदिन कोरोनासंसर्ग दर ०.२५% नोंदवण्यात आाला. देशात आता केवळ ११ हजार ३६५ सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. तर, ४ कोटी २५ लाख १ हजार १९६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख २१ हजार ६५६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८५ कोटी ५५ लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यातील १४ लाख ७९ हजार ५४४ डोस गुरूवारी दिवसभरात देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८८ कोटी ४७ लाख ९० हजार ४९५ डोस पैकी १७ कोटी ५४ लाख ५२ हजार ८९६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७९.३४ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ६६ हजार ३६२ तपासण्या गुरूवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button