Latest

Maharashtra Cabinet : आता गल्लीतल्या दुकानांमध्ये वाईन मिळणार?

backup backup

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मागील महिन्यात कर कमी करून सरकारने दारूचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला हाेता. दरम्यान राज्यात सध्या सुपर मार्केट, किराणा मालाचे दुकान याचबरोबर वॉक इन स्टोअरमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. वाईन विक्रीतून महसूल वाढविण्यासाठी सरकार हा निर्णय घेत आहे. (Maharashtra Cabinet)

राज्य सरकार महसूलात वाढ करण्यासाठी नवा वाईन विक्रीचा प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावामुळे राज्याच्या महसुलात हजारो कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Cabinet : वाईनची विक्री करण्यास परवानगी मिळणार

राज्याचा नवा वाईन प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाल्यास राज्यातील सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर आणि जनरल स्टोअरमध्ये वाईनची विक्री करण्यास परवानगी मिळणार आहे.

आज (दि.२७) दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये वाईन विक्रीच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. यापुर्वी भाजपकडून याला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत नवा प्रस्ताव मान्य केल्यास भाजपाकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT