Latest

Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये आज मूक मोर्चा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लव्ह जिहाद (Love Jihad)  व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी (दि. २८) विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता शहरातील बी. डी. भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिल्ली येथील श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर लव्ह जिहादविरोधात (Love Jihad)  देशभरात संतापाची लाट उसळली आहे. लव्ह जिहादच्या नावे मुलींवर धार्मिक, शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राज्यात हिंदू संघटनांनी एकत्रित येऊन मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हानिहाय मोर्चा निघत असून सोमवारी बी. डी. भालेकर मैदानापासून सकाळी 10 वाजता माेर्चा निघणार आहे. यात शहरासह जिल्हाभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला आहे. बी. डी. भालेकर मैदानापासून निघणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राहणार असून तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कडक बंदोबस्त

मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी होणार असल्याने शहर पोलिसांनीही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार सरकारवाडा व भद्रकाली पोलिस ठाण्यांसह आवश्यकतेनुसार अतिरिक्त बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. यासाठी परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT