Latest

कराड : बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलावर हल्ला

backup backup

कराड; पुढारी वृत्तसेवा : वडिलांबरोबर शेतात गेलेल्या पाच वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. मुलाला जबड्यात धरून पळून जात असताना वडिलांनी प्रसंगावधान राखत मुलाला पकडून ठेवले व आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून तिथून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कराड तालुक्यातील किरपे येथे गुरुवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येणके येथे लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना ताजी असतानाच तेथून जवळच किरपे येथे दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच बिबट्याला पकडण्याची मागणी होत आहे.

राज धनंजय देवकर (वय 5, रा. किरपे, ता. कराड) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरपे येथे संध्याकाळी ६ वाजता धनंजय देवकर हे शेतातून घरी निघाले होते. शेती कामासाठी बरोबर असलेले साहित्य ते वाकून पिशवीत भरत होते. दरम्यान त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा मुलगा राज हा वडिलांना मदत करण्यासाठी म्हणून तो खाली वाकून साहित्य देऊ लागला. चिमुकला वाकल्याचे दिसताच बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. चिमुकलीची मान बिबट्याने जबड्यात धरून त्याला ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच वेळेला प्रसंगावधान राखत वडील धनंजय देवकर यांनी मुलाला घट्ट पकडून ठेवत आरडाओरडा केला. तसेच त्या शेताला तारेचे कंपाउंड असल्याने बिबट्याला मुलाला घेऊन तेथून जाता आले नाही.

डिलांचा आरडाओरडा ऐकून मुलाला तेथेच सोडून बिबट्याने तेथून धूम ठोकली. धनंजय देवकर यांनी धैर्याने बिबट्याने मुलावर केलेला हल्ला परतवून लावला. बिबट्या पळून गेल्यानंतर देवकर यांनी मुलाला उचलून घेतले. त्याच्या मानेवर व कानाला बिबट्याच्या दात लागून तो जखमी झाला आहे. तर फरफटत घेऊन जात असताना त्याच्या पायाला व पाठीला जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी नागरिकांच्या मदतीने मुलाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, कराड परिक्षेत्राचे वनाधिकारी तुषार नवले मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी रुग्णालयात जाऊन राज देवकर या चिमुकल्याची विचारपूस केली.

च्यावर उपचार सुरू झाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबत विचारविनिमय करणार असल्याचे वन अधिकारी तुषार नवले यांनी सांगितले.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT