Miss India Washington : पुण्यात शिकलेली आदिती पतंगे ठरली मिस इंडिया वॉशिंग्टन | पुढारी

Miss India Washington : पुण्यात शिकलेली आदिती पतंगे ठरली मिस इंडिया वॉशिंग्टन

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात शिक्षण झालेली व भुसावळ आजोळ असलेली आदिती पतंगे हिने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021’ हा अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान पटकावला आहे. (Miss India Washington)

आदिती ही संगीता व प्रवीण पतंगे यांची एकुलती एक मुलगी आहे. आईचे माहेर भुसावळ असून अदितीचा जन्म देखील भुसावळ येथे झाला. तिचे 12 वी पर्यंतचे शिक्षण हे पुणे येथे झाले. अवघ्या 17 व्या वर्षी ती उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले.

आदितीचे चौथी पर्यंतचे शिक्षण भारती विद्याभवन तर 12 पर्यंतचे शिक्षण मिलेनियम नॅशनल स्कूल येथे झाले. तिने संगणक अभियंता ही पदवी अमेरिकेतील पेनसिल्वेनिया या राज्याच्या विद्यापीठातून मिळवली. (Miss India Washington)

आपल्या बुध्दीमतेच्या जोरावर मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये कार्यरत झाली. लहानपणापासूनच आदितीला मॉडेलिंग आणि अभियाची आवड. कोरोना काळात तिने घरातून काम करून तिने मिस इंडीया वॉशिंग्टन युएसए या स्पर्धेत भाग घेतला व ती 22 स्पर्धकांतून विजेती ठरली.

Back to top button