Remo D'Souza : रेमो डिसूझाच्या मेहुण्याचा राहत्या घरात आढळला मृतदेह | पुढारी

Remo D'Souza : रेमो डिसूझाच्या मेहुण्याचा राहत्या घरात आढळला मृतदेह

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध असणारे डान्सर, कोरियोग्राफर तसेच दिग्दर्शक रेमो डिसूजा (Remo D’Souza) यांच्या मेहूण्याचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला आहे. जेसन वॉटकिन्स (Jason Watkins) असे रेमो डिसूजा यांच्या मेहुण्याचे नाव असून ते देखिल बॉलिवूडमध्ये सक्रीय होते. रेमो डिसूजा याच्या पत्नीने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन भावूक पोस्ट लिहली आहे.

रेमो डिसूजा (Remo D’Souza) यांचे मेहुणे जेसन वॉटकिन्स यांचा मृतदेह ते रहात असलेल्या घरी मिल्लत नगर येथून आढळून आला. जेसन यांच्या मृतदेहास कपूर रुग्णालयात आणण्यात आले असून ओशिवरा पोलीस पुढील तपास करीत आहेत. रेमो यांची पत्नी लिझेल डिसुझा (Lizelle D’Souza) यांनी आपल्या भावा सोबतचा फोटो शेअर करुन तू असे कसे करु शकतोस, तुला मी कधीही माफ करणार नाही असे लिहले आहे.

Remo D'Souza

रेमो डिसूजा आणि त्यांची पत्नी लिझेल या सध्या गोव्यात नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी गेले आहेत. अजून ते मुंबईत परतलेले नाहीत. त्यामुळे रेमो यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जेसन वॅटकिन्स हे देखिल रेमो डिसुजा यांच्या सोबत अनेक काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी रेमो यांच्या सोबत अनेक प्रोजक्टमध्ये सोबत काम केले आहे. तसेच रेमो यांच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखिल जबाबदारी सांभाळली आहे.

Back to top button