Latest

विधान परिषद निवडणूक : “…बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा”, अनिल बोंडेचे ट्विट चर्चेत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरु आहे. दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपचे आमदार मतदान करत आहेत. दहा जागांसाठी शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, भाजपचे पाच असे अकरा उमेदवार असल्याने या निवडणूकीला चांगली रंगत आली आहे. प्रत्येक पक्ष दावा करत आहे की, आपलेच उमेदवार अधिकाधिक मतांनी निवडून येतील. राज्यसभेतील भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या सूचक ट्विटने या निवडणुकीला वेगळे वळण येते की काय अशी चर्ची सुरु आहे. (विधान परिषद निवडणूक 2022)

डॉ. अनिल बोंडे : काय आहे ट्विट?

राज्यसभेतील भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक सुचक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे  की, "काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा," असे म्हणत अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटमधून कोणाला टोला मारला असावा?, 'हा मिशीवाला मावळा कोण ? असे प्रश्न अनेकांना पडला आहे. पण या ट्विटची  सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे.

विधान परिषद निवडणूक उमेदवार

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी
काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी : रामराजे नाईक-निंबाळकर,
एकनाथ खडसे
भाजप : प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा
खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT