Latest

Viswanathan Anand : आशियाई स्पर्धेत असणार ‘या’ नव्या भूमिकेत

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चीनमध्ये 10 सप्टेंबरपासून आशियाई स्पर्धा सुरू होत आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशनला त्यांचे पुरुष आणि महिला संघ आशियाई स्पर्धेत मेडल पदक जिंकतील अशी आशा आहे. यासाठी फेडरेशनने दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला (Viswanathan Anand) एक वेगळी भूमिका देऊ केली आहे.

ऑल इंडिया चेस फेडरेशनने म्हटले आहे की, आशियाई स्पर्धेत आमचे चार सुवर्ण पदके जिंकण्याचे टार्गेट असेल. त्यासाठी आम्ही दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला (Viswanathan Anand) एक वेगळी भुमिका देणार आहोत. तो आता संघाचा मेंटॉर असणार आहे. खेळाडूंचे त्याच्यासोबतचे पहिले सत्र पुढच्या गुरुवारपासून सुरू होईल. 2010 मध्ये झालेल्या गुआंगझोऊ गेम्समध्ये भारताला फक्त दोन कांस्य पदके जिंकता आली होती.

हे संघ खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय रँकिंग लक्षात घेऊन निवडला आहे. पुरुष संघात वैदित गुजराथी, पी. हरीकृष्णा, निहाल सरिन, एस. एल. नारायणन, के. शशिकिरण, बी. अधिबन, कार्तिकेयन मुरली, अर्जुन इरिगासिस, अभिजित गुप्ता आणि सूर्या शेखर गांगुली यांचा तर महिलांच्या संघात के. हम्पी, डी. हरिका, वैशाली आर. तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, वनतिका अग्रवाल, मेरी अ‍ॅन गोमेज, सौम्या स्वामिनाथन आणि इशा करवडे यांचा समावेश आहे.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT