

मुंबई; पुढारी ऑनलाईन : उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ) नेहमी आपल्या अदाकारी व स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते. पण, यावेळी तिने अनेकांना आपल्या नव्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ तर केलेच शिवाय आपल्या नावे मानाचा तुराच रोवला आहे. उर्वशीने अशी पहिली अभिनेत्री अथवा भारतीय कलाकार, मॉडेल ठरली आहे. जीने अरब फॅशन वीक या मानच्या फॅशन शोमध्ये दुसऱ्यांदा सहभागी होण्याचा मान मिळवला. फक्त इथेच तिचे कौतुक थांबत नाही तर या शोमध्ये तिने तब्बल ४० कोटींचा सोन्याने बनविलेला ड्रेस परिधान करुन सर्वाना अवाक करुन सोडले.
उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ) हिने परिधान केलेला हाय डीप कट स्लिप्ट गोल्डन ॲम्बेलिश्ड गाऊन चाहत्यांना घायाळ करुन सोडत आहेत. हा गोल्डन रॉब खूपच मोठा आणि जमिनीवर पसलेला. तिने घातलेला हेडगिअर खऱ्या सोन्याचा आणि हिऱ्यांचा बनवलेला आहे. प्रसिद्ध डिझायनर फर्ने वन अमाटो यांनी या ड्रेसचे डिझाईन केले आहे. अमाटो यांनी यापुर्वी बेयॉन्से आणि जेनिफर लोपेज यांचे ड्रेस सुद्धा डिझाईन केले आहेत.
उर्वशी रौतेला अरब सुपरस्टार मोहम्मद रमादन याच्या सोबतच्या 'वर्साचे बेबी' या गाण्यामध्ये नुकतीच दिसली होती. ती सध्या 'इन्स्पेक्टर अविनाश' नावाची वेब सिरीज करत असून यामध्ये ती रणदीप हुड्डा सोबत दिसणार आहे. तसेच ती ब्लॅक रोज या थ्रिलर चित्रपट व 'थिरुट्टू पायले २' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.