पुढारी ऑनलाईन डेस्क : फ्रेंचमधील स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे याने सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबकडून खेळण्याची ऑफर नाकारली आहे. पॅरिस सेंट जर्मेन (PSG) कडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या एम्बाप्पेने अल हिलालच्या प्रतिनिधींना भेटण्यास नकार दिला. 'अल हिलाल'ने एम्बाप्पे याला ३३२ मिलियन अमेरिकन डाॅलर (सुमारे २७२५ कोटी रुपये) अशी विक्रमी ऑफर दिली होती, असे वृत्त L'Equipe या दैनिकाने दिले आहे. (Kylian Mbappe Transfer Update)
एम्बाप्पेच्या एजंटने सौदी क्लबच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास नकार दिला. एमबाप्पेने कधीही सौदी अरेबियाला जाण्याचा पर्यायी विचार केला नव्हता. पीएसजीने अल हिलालसोबत एमबाप्पेशी बोलणी सुरू करण्यास परवानगी दिली होती. एम्बाप्पेला कधीही सौदी लीगमध्ये खेळायचे नाही हे पीएसजीला माहीत होते. असे असतानाही पीएसजीने अल-हिलालला बोलणी करण्याची परवानगी दिली होती. (Kylian Mbappe Transfer Update)
गेल्या महिन्यात एमबाप्पे म्हणाला होता की, तो पीएसजी सोबतचा करार जून २०२४ पर्यंत वाढवू इच्छित नाही. एमबाप्पेने २०२२ मध्ये पीएसजीसोबत नवीन करार केला होता. यानंतर २०२५ पर्यंत संघासोबत राहण्याचे आश्वासन दिले होते. एमबाप्पे आणि पीएसजी यांच्यातील करारानुसार एमबाप्पे २०२४ पर्यंत क्लबकडून खेळणार होता. यानंतर तो करार एक वर्षासाठी वाढणार होता. परंतु, एम्बाप्पेने क्लबला एक वर्ष अगोदरच सोडचिट्टी देत जून २०२४ नंतर करार वाढवणार नसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा;