पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाच्या स्वातंत्र्य काळात योगदान असलेल्या आणि पुण्याच्या जडण-घडणीत मोठे योगदान असलेल्या ब्रिटिश कालीन पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीचा 98 वा वाढदिवस गुरुवारी (दि.27) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम 27 जुलै 1925 रोजी ब्रिटिश गव्हर्नर लेसली ओरमे व्हिलसन यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रज वास्तुविशारद जेम्स बरकली यांनी पूर्ण केले.
त्याचे उदघाटन त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नर लेसली ओरमे व्हिलसन यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या बांधकामासाठी त्यावेळी 5 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.27)रोजी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे प्रवासी ग्रुप यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्टेशन निर्देशक मदनलाल मीना, आयआरसिटीसीचे एरिया मॅनेजर गुरुराज सोना, स्टेशन मॅनेजर सुनील ढोबळे, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा व रेल्वे स्थानाकावरील अन्य अधिकारी, कर्मचारी, हमाल वर्ग, सफाई कर्मचारी उपस्थित होते. हर्षा शहा म्हणाल्या, पुणे रेल्वे स्थानकाला हेरिटेज दर्जा आहे, आता त्याला युनोमार्फत जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी.
हेही वाचा :