मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंदमाता, सायन, अंधेरी, वांद्रे, मालाड आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे.
मध्य व पश्चिम रेल्वेची लोकल सेवाही पाच ते दहा मिनिटे विलंबाने सुरू आहे. पाऊस व जोरदार वारा यामुळे सुमारे १५ ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या. तर ४ ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे. मात्र यात कुणालाही मार लागला नाही. दरम्यान झाडाखाली कोणीही थांबू नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :