Latest

यशंवत जाधव शिवसेनेचे फंड कलेक्टर : किरीट सोमय्या

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएच्या सदनिका हडप केल्या. तसेच यशंवत जाधव मनी लॉंड्रिंग करत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somya) यांनी आज (शुक्रवार) दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की , मविआतील नेत्यांचे घोटळे सिद्ध होऊ लागले आहेत. घोटाळ्यात यशवंत जाधव, किशोरी पेडणेकर यांचे नांव राहिले होते. यशवंत जाधव मनी लॉंड्रिंग करत असून त्यांच्या खात्यात १५ कोटी रूपये येत होते. त्यातील काही पैसा युएईला पाठवला जात होता. जाधव शिवसेनेचे फंड कलेक्टर असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली. त्याचबरोबर जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी आमदारकीचा अर्ज दाखल करताना माहिती लपवली आहे. याची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे, असेही सोमय्या (Kirit Somya) यांनी सांगितले.

दरम्यान, यशवंत जाधवांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाने आज छापेमारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊ आरोप केले आहेत. तसेच आणखी चार जणांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT